विदर्भ, १९ सप्टेंबर २०२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज आपली मते माध्यमांसमोर व्यक्त केली.
फॅाक्सकॅान आणि वेदांता प्रकल्प गुजरातकडे गेल्यावरुन त्यांनी भाष्य केलं. प्रकल्प गुजरातमध्ये का गेला? आणि ते गणित फिसकटले याचा शोध घेणं गरजेचं असल्याचे त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या उद्योगधंद्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी यावेळी ठासून सांगितलं. राज्यातील प्रकल्प हा बाहेर जातोच कसा? हे पहाणं आत्ताच गरजेचं आहे. मात्र चित्ते मध्यप्रदेशात गेले असं म्हणत त्यांनी खोचक टोला दिला आहे.
या मुद्द्यांआधी त्यांनी जनतेला सवाल विचारला. वारंवार अपमान होऊन जर त्याच लोकांना निवडून दिलं जात असेल तर जनतेनी मत देताना विचार करण्याची गरज आहे .त्यांना धक्का देण्याची गरज आहे. शिवसेनेने लोकांचा अपमान केला. त्यांना धक्का देण्याची आवश्यक्ता आहे.
नवी कार्यकारिणी घटस्थापनेला करणार असल्याचं त्यांनी सांगितले . तसेत चाललेल्या घाणेरड्या राजकारणावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा फडणवीस मुख्यमंत्री होणार असं सभेत जाहीर तर होते, तेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रश्न कोणी का उपस्थित केला नाही ? असा सवाल त्यांनी यावेळीही उपस्थित केला. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद अशी चर्चा कधीच झाली नसल्याचे त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी विकास आराखड्यावर ही प्रकाश झोत टाकला. एकुणातच आता मनसे आक्रमक म्हणण्यापेक्षा in working mode असं म्हणावं लागेल. जी सध्या स्थिती आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस