राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली पक्षातून काढण्याची धमकी; काय आहे कारण?

8

मुंबई २३ ऑगस्ट २०२२ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना काढण्याची धमकी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी सोशल मिडीयाचा मुद्दा उपस्थित केला. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.

महाराष्ट्रात बाकिच्य पक्षांमध्ये धुडगूस चालु देत पणा माझ्या पक्षात हे चालणार नाही. बाळा नांदगावकर यांनी सोशल मिडीयाचा मुद्दा उपस्थित केला होता. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे बोलतात मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो.

जर समजा पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरीत कॉमेंट केल्या तर त्याला एक क्षण भऱही पक्षात ठेवणार नाही.तुमचे चोचले आत्तापर्यंत खुप झाले.
तुम्हाला तुमचं काम सांगायच असेल तर सोशल मीडियाचा उपयोग करा. पण कोणी कोणाच्या विरोधात बोलत असेल तर त्याला माझ्यापर्यंत पोहचवा. माझ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. असे सभेत कार्यकर्त्यांना संबोधले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे