राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईत गुप्त बैठक?

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि राज ठाकरे यांच्यात मंगळवारी ( दि.७) रोजी मुबंईत गुप्त बैठक झाली. हॉटेल इंडिया बुल्स काय येथे दोघांची दोन तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या भेटीमुळे महाराष्ट्रात नवीन समीकरण जुळण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकं काय झालं याचा तपशील समजू शकला नाही. मात्र या भेटीमुळे राज ठाकरे भाजपात जणांच्या चर्चेला मात्र उधाण आले आहे.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी महाविकास मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
शिवसेना हिंदुत्व विसरली आहे अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरेंची मनसे ही जागा भरुन काढू शकते अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. तसेच तसंच भाजपालाही हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या पक्षाची साथ हवीच आहे. दरम्यान या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेे हे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत कालच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले होते. त्यानंतर आजच या दोघांची भेट झाल्याची बातमी समोर आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा