यंदाच्या युजी, पीजच्या परीक्षा सर्व विद्यापीठाने न घेण्याचा राजस्थान सरकारचा निर्णय

राजस्थान, ५ जुलै २०२० : सध्याची कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता राजस्थान सरकारने यावर्षी राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि तांत्रिक शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आकाशवाणीच्या बातमीदारांनी दिलेल्या वृत्तानुसार, उच्च शिक्षण राज्यमंत्री भंवरसिंग भाटी यांनी सांगितले की, यंदा सर्व यूजी व पीजी विद्यार्थ्यांना पदवीनंतर पुढील वर्गात पदोन्नती दिली जाईल.

दुसरीकडे आरोग्यमंत्री डॉ. रघु शर्मा म्हणाले की, राज्यात दररोज ४१ हजार नमुन्यांची चाचणी सुविधा विकसित केली गेली ती आता दररोज ५० हजार चाचण्या पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

२० जिल्ह्यांत कोविड चाचणी सुविधा सुरू करण्यात आली असून, राज्यातील उर्वरित १३ जिल्ह्यांमध्येही लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल. दरम्यान, काल ४८० जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली, जी एका दिवसात सर्वाधिक आहे. आज सकाळी आणखी २२४ प्रकरणे नोंदली गेली आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा