राजस्थान सरकार हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये दारू विक्रीसंदर्भात जारी केल्या आरोग्य मार्गदर्शक सूचना

जयपूर (राजस्थान) २४ जून २०२० : राजस्थान उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्समधील पुन्हा सुरू झालेल्या मद्य विक्रीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोविड -१९ च्या प्रादुर्भावानंतर मद्य विक्री बंद होती नंतर ती ऑनलाइन बुकिंग प्रमाणे सुरू झाली परंतू आता ती हॉटेल व रेस्टॉरंटमधून सुरू करण्याच्या सुचना राजस्थान सरकारने घेतला असल्याने त्याच्या मार्गदर्शक सुचना पण जारी केल्या आहेत. उत्पादन शुल्क आयुक्त विष्णू चरण मलिक यांनी मंगळवारी विचारणा करून मार्गदर्शक सूचना जारी केली.

हॉटेल आणि बारमध्ये सामाजिक अंतरांचे निकष सुनिश्चित करण्यासाठी मालक,
मार्गदर्शक सूचनांनुसार बार काउंटर, खुर्च्या, ग्लास, प्लेट योग्य प्रकारे स्वच्छ केले पाहिजेत.
वाइन, व्हिस्की आणि बीयरच्या सर्व बाटल्या, योग्य प्रमाणात स्वच्छ केल्या पाहिजेत जंतुनाशक फवारणी केली पाहिजे. तसेच अन्न चांगल्या दर्जाचे असले पाहिजे. याशिवाय बर्फ कंटेनर आणि ट्रॉली देखील नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार १५२३२ कोविड -१९ ची प्रकरणे असून त्यात २,९६६ सक्रिय आहेत
राज्यात आतापर्यंत ११,९१० रूग्ण बरे झाले असून ३५६ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा