राजस्थानमध्ये येणार सर्वात तरुण न्यायाधीश

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सर्वात तरूण न्यायाधीश म्हणून मयंक प्रताप सिंग (वय २१) हे पदभार स्वीकारणार आहे. मयंक २०१८ सालच्या राजस्थान न्याय सेवेच्या परीक्षेला बसला होता. मयंकने पहिल्या प्रयत्नातच ही परीक्षा उत्तीर्ण केली.

यापूर्वी परीक्षेचे किमान वय २३ वर्षे होते. दरम्यान यावर्षी जानेवारीत राजस्थान उच्च न्यायालयाने वय २१ वर्षे केले. यामुळे मयंक या परीक्षेस पात्र ठरला. मयंक राजस्थानमधील मानसरोवरचा आहे. यावर्षी एप्रिलमध्ये राजस्थान विद्यापीठातून त्याने कायद्याचे पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण केले आहे. मयंकने न्यायालयीन शिक्षण संपल्यानंतर परीक्षा दिली होती.
दरम्यान, मयंकनेमला मि‍ळालेल्या यशात खऱ्या अर्थाने माझ्या कुटूंबासह, शिक्षकांचे पाठबळ असल्याचे सांगितले. मला मिळालेल्या यशाने मी भारावून गेलो आहे. कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कायद्याच्या परीक्षेला बसलेल्या विध्यार्थ्याना याचे प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच मला कमी काळात मोठ्या गोष्टी मिळणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. त्यावेळी एक आदर्श निर्माण केला असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा