राज्यात होणार २७ नवीन टेस्टिंग लॅब: अजोय मेहता

मुंबई, दि.३० मे २०२०: राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६० हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. राज्यात दररोज सरासरी २ हजार रुग्ण सापडत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर अधिकाधिक चाचण्या करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात आणखी २७ नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली.

राज्यात ९ मार्चला केवळ दोन प्रयोगशाळा होत्या. त्यात मोठ्या संख्येने वाढ केल्याने आज ७२ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात बाधित रुग्ण सापडत असल्याने नव्याने २७ प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या काही दिवसात या नवीन प्रयोगशाळा कार्यान्वित होतील. त्यामध्ये रत्नागिरी येथे १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि १८ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या १०० इतकी होणार असून रुग्णांची तपासणी करणे त्यामुळे सोपे होणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा