राजकारण, थोडा विचार करा मग मतदान करा..

हे थोडा वेळ काढून वाचाच एकदा
             शरद पवारांनी साखर कारखाने, बॅंका, दुध डेअरी आदी क्षेत्रात सहकार चळवळीतून मोठे केलेले एक-एक मराठा नेते भाजपात जात आहेत, गेले आहेत. पवारांनी यांना जेवढे मानाचे पान दिले तेवढे भाजपात मिळत नाही हे मागील अनेक घटनांवरून स्पष्ट दिसून येते. पण सत्तेच्या लालसेतून व महत्त्वकांक्षेतून आपले हे नेते याकडे दुर्लक्ष करत पटापट भाजपात जात आहेत. या नेत्यांना माहित आहे की भाजपात आपल्याला मान- पान मिळणार नाही, किंमत नाही. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही आणि घेतले जाणारही नाही. आज अनेक ठिकाणी एकतर्फी निर्णय लादले जात आहेत पण सत्तेसाठी लाचार झालेले नेते मुकाट्याने हे सहन करत आहेत.
 
              आता ताजी घटना मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. माळशिरस तालुक्यातून विधानसभेसाठी भाजपकडून राम सातपुते नावाच्या मराठवाड्यातील एका तरुणाने अर्ज दाखल केला आहे. हा तरुण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कट्टर मुशीत तयार झालेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) संघटनेतील सक्रिय असलेल्या सातपुतेंची उमेदवारी माळशिरस तालुक्यावर अक्षरश लादली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहितेंना आदेश दिला की, आमच्या राम सातपुतेंना तुमच्या मतदारसंघातून निवडून आणा. बरं ही जागा रामदास आठवलेंच्या आरपीआयला सोडली आहे पण त्या जागेवरही यांना RSS मधील लोकच निवडून आलेली पाहिजेत. आज मराठ्यांच्या नेत्यांनी भाजपचे मांडलिकत्व स्वीकारून मराठा समाजाला फरफटत नेले आहे तसेच आज आठवलेंनी सुद्धा आंबेडकरांच्या अनुययांना भाजपची लाचारी करायला भाग पाडले आहे. अभ्यासू दलित कार्यकर्ता मात्र आज आठवलेंची साथ सोडून प्रकाश आंबेडकरांसोबत गेला याचा आनंद आहे. आज भाजपने महादेव जानकर वगळता सर्व मित्रपक्षांना भाजपच्या कमळावर निवडणूक लढविण्यास भाग पाडले आहे. जानकरांना केवळ २ जागा दिल्या कारण काय तर ते त्यांच्या रासप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शून्य ताकद असलेल्या सदाभाऊ खोतांना ३, कुत्रही विचारत नसलेल्या मेटेंना ३ तर संपूर्ण दलित समाज आंबेडकरांसोबत गेल्याने गलितगात्र झालेल्या आठवलेंना ६ जागा दिल्या आहेत. खोत, मेटे व आठवलेंना सोडलेल्या बहुतेक जागांवर मुख्यमंत्र्यांनी भाजपमधील लोकांना तिकीट दिल्याचे तुम्हाला दिसेल.
 
             तर, मी मूळ मुद्यावर येतो… माळशिरसमधून बाहेरचा नाही तर तालुक्यातीलच उमेदवार असेल तर आपल्या बाळादादांनी (जयसिंह मोहिते- पाटील) यांनी जाहीर केले होते. त्यानुसार डॉ. विवेक गुजर यांचे नाव निश्चित झाले पण ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रणजितसिंह यांच्याशी बोलणी करून गुजर यांची उमेदवारी रद्द केली व राम सातपुतेंचा अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला. विधानसभा निकालानंतर काही नाही निदान विधान परिषदेची आमदारकी तरी मिळेल अशी अपेक्षा ठेऊन रणजितसिंहांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळला व पहिली लाचारी केली. होय, मी लाचारी म्हणेन कारण आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील आमदारकीचा उमेदवार ठरविण्याचाही अधिकार राहिला नाही हे सातपुतेंच्या उमेदवारीनंतर स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीत असताना तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्व आमदार विजयदादा ठरवायचे तेव्हा आपल्याला अभिमान वाटायचा. आपल्या दादांच्या शब्दांना मान होता, दादा म्हणतील त्यांना पवार मंत्री करायचे, सत्तेतील इतर पदे द्यायचे. पण आज सातपुतेंच्या उमेदवारीनंतर रणजितदादांनी भाजपची केलेली लाचारी सहन होत नाही, म्हणून हे लिहायला घेतले
                बरं, लाचारी कशाची तर भाजपचे सरकार आल्यानंतर काहीतरी मिळेल अशी अपेक्षा ठेऊन. मूळात भाजप रणजितसिंहांना नव्हे तर कुठल्याच मराठा नेत्यांना काही देणार नाहीत. अपवाद राधाकृष्ण विखे पाटलांचा सोडून. भाजपने राज्यातील सगळ्या बड्या मराठा नेत्यांना खालसा करण्याचे दृष्टीने पावले टाकली आहेत. खुद्द भाजपमधीलच विनोद तावडेंचे काय केले कळले ना? चंद्रकांतदादांना शिवेंद्रराजे चालतो पण उदयनराजे चालत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना मोहिते- पाटील चालतात पण चंद्रकांदादांना ते चालत नाहीत. चंद्रकांतदादांना एकही मोठा मराठा भाजपात नको आहे, हवेत ते दुसऱ्या फळीतील दुय्यम नेते. म्हणजे कोण खासदार रणजितसिंह निंबाळकर, संजयमामा शिंदे, शिवेंद्रराजे आणि असे… तर नको कोण आहेत राणे, विखे, मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील घराणे, हर्षवर्धन पाटील असे नेते नको आहेत. आता म्हणाल त्यात काय… तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बड्या नेत्यांना आपल्या सोबत, गटात घेऊन केवळ वापर करणार आणि फेकून देणार. आज भाजपात गेलेले मोठे मराठा नेते सत्तेत कुठे तरी स्थान मिळेल म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मागे- पुढे करत आहेत. पण पाच वर्षांनी हेच मराठा नेते अक्षरश रांगतील, हे आजच लिहून ठेवा. भाजपात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी कुठला नेता वर जाईल व वरचा नेता खाली जाईल याचा नेम नाही. खडसे- तावडेंचा बघा. गडकरी तोंड दाबून बुक्कांचा मार सहन करताहेत. उद्या फडणवीस मुख्यमंत्रीपदावरून हटल्यावर काय होईल. राजकीय वर्तुळात चर्चा तर आतापासूनच अशी आहे की, फडणवीस एक-दोन वर्षांनी केंद्रात जातील. त्यांना अर्थमंत्री केले जाईल. अमित शहांना फडणवीस नको आहेत चंद्रकांत पाटील हवेत. समजा उद्या अमित शहांच्या आशीर्वादाने चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री झाले तर फडणवीसांनी भाजपात घेतलेल्या बड्या मराठा नेत्यांचे काय होईल? कल्पनाच करवत नाही.
 
            २०१४ साली भाजपात गेलेले मराठा किंवा काँग्रेस- राष्ट्रवादीतील आज कोठे आहेत याची जरा माहिती व यादी करा मग लक्षात येईल तुमच्या… केंद्रीयमंत्री राहिलेल्या सुर्यकांता पाटील यांचे नाव तरी आहे आज राजकीय पटलावर… बबनराव पाचपुते पासून अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. भाजप- संघ शॉर्ट टर्म नाही तर लाँग टर्म धोरणांवर काम करतो. पुढच्या पंचवार्षिकपर्यंत एकही मराठा नेता आव्हान देण्याच्या लायकीचा राहणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी आता तरी सावध व्हावे, अजूनही वेळ गेली नाही. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे भाजपचा उमेदवार पाडणे गरजेचे आहे. भाजप, संघाचे लोक किंवा ब्रह्मण समाजाकडून काही तरी शिका ते उमेदवार कधीच बघत नाहीत फक्त पाहतात कमळ किंवा त्यांच्या मित्रपक्षाचे चिन्ह आणि मतदान करतात. या उलट मराठे म्हणणार हा नको हा माळी आहे, हा वंजारी आहे, हा तर धनगर आहे या हराम्यांना कशाला मते द्यायची. भाजपात असला तरी मराठ्यांच्या उमेदवारालाच मत द्यायचे याचमुळे आज मराठ्यांवर ही वेळ आली आहे. आजही शरद पवारांचे हात बळकट करण्याची गरज आहे. मराठ्यांना आज जी काही किंमत आहे ती केवळ शरद पवार यांच्यामुळेच हे कधीही विसरता कामा नये. माळशिरस तालुक्यातील राम सातपुते नावाचा उमेदवाराला मत दिले नाही पाहिजे जरी आपण मोहिते- पाटील समर्थक असलो तरी. मी तर म्हणतो राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणाऱ्या उत्तम जानकरांनाच मतदान केले पाहिजे. दीर्घकालीन धोरणांवर आतापासून काम करा, तुमची ताकद, आब, सत्ता कायम राहील. अनेक कट्टर मराठा लोक म्हणताहेत की कोणालाही मतदान करा पण धनगर समाजाच्या जानकरांना मतदान करू नका पण मी म्हणतो… शरद पवारांची ताकद वाढवायची असेल तर तुमच्या- माझ्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी जानकरांना नव्हे तर घडाळ्यावर शिक्का मारा नाहीतर तुमचा आमचा राजकीय आणि सामाजिक विनाश अटळ आहे.
               मोहिते- पाटील समर्थक म्हणून आपण त्यांच्या अनेक चुका पोटात घातल्या. ऊसाची बिले नाहीत, साखर कारखाने बंद पाडले, शिवामृत दुधसंघाचे वाटोळे केले, दूधसंघाच्या नवी मुंबईतील जमिनीसह दूध डेअरीच्या तालुक्यातील गावोगावातील मोक्याची जमिनी, जागा विकून खाल्या, कुक्कुटपालन डुबले, त्याच्या जमिनीचा लिलाव झाला, सुमित्रा पतसंस्था लुटून खाल्ली तरी तालुक्याची अस्मिता म्हणून सहन केले. पण आता सहन होत नाही. विजयदादा, बाळदादा यांच्याकडे पाहून गप्प बसतो पण रणजितसिंह हे दिवसेंदिवसे भाजपची लाचारी करण्यात धन्यता मानत आहेत. रणजितसिंह यांनी तालुक्यातीलच उमेदवार द्यायला हवा होता आणि मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगायला हवे होते, आम्ही आमच्या तालुक्यातीलच उमेदवार निवडून आणू. पण कसले काय?… विजयदादा, बाळदादांना हे पटत नाही पण काय करणार.. एक काळ गाजवलेल्या नव्हे मागील ४०-५० वर्षे आपला ठसा उमटवलेल्या व कर्तृत्त्व गाजवलेल्या दादांना कतृत्त्वशून्य पुत्रापुढे तर बाळदादांना पुतण्यापुढे मूग गिळून गप्प बसावे लागतेय आणि ‘हो ला हो’ म्हणाले लागतेय… पण हे खूप वाईट आहे… हे मी खूप तळमळीने लिहतोय… यांना सहकारी संस्था नीट चालवता आल्या नाहीत आणि आर्थिक संकटाने ग्रासले. आता भाजपने हे ओळखून यांना मदत करण्याऐवजी एकप्रकारे गळचेपी सुरु केली आहे.
 
             म्हणून आज मी मन व काळजावर दगड ठेऊन म्हणतो की, शरद पवारांना साथ द्या, फक्त घडाळ्यावर शिक्का मारा… माळशिरस तालुक्यातील सूज्ञ, विचारी, सद्विवेक बुद्धी असणाऱ्या सुजाण नागरिकांना, तरुणांना, महिलांना, तरुणींना मी हे आवाहन करत आहे. फक्त घड्याळ आणि घड्याळ. माझी तळमळ तुमच्यापर्यंत पोहचेल अशी आशा आहे.
 
धन्यवाद…
 
कळावे आपला,
 
विजयदादाप्रेमी….
अकलूजकर/ माळशिरसकर
 
एक सूचना : रणजितदादा तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्याचे फार दु:ख झाले नव्हते, पण सध्या तुम्ही जी भाजपची लाचारी करत आहात ती ना आता सहन होत नाही. तुम्हाला सुबुद्धी सुचो, एवढीच प्रार्थना व माफक अपेक्षा…                                                                                                                   -मी एक अनामिक  

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा