वाळवंटातील मृगजळ

राजेश पायलट यांचे चिरंजीव सचिन पायलट राजेश पायलट हे काँग्रेसचे राजस्थानातील मोठे नेते वडिलांच्या पुण्याईवर ती राजकारणात पाय टाकलेले. गेल्या विधानसभेला मोदी व शहा यांच्या लाटे समोर राजस्थानात खंबीरपणे तोंड दिले होते, त्यात सचिन पायलटचाही मोठा हात होता. राजस्थानमध्ये कॉंग्रेसने सत्ता राखण्यात यश मिळवले व सरकार स्थापन केले अशोक गेहलोत मुख्यमंत्री व सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री देण्यात आले होते इथूनच नाराजी नाट्याला सुरुवात झाली होती कारण सचिन पायलट ला मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल अशी अपेक्षा होती ती काँग्रेसने धुळीस मिळवली व तिथूनच सचिन पायलट नाराज आहेत असे प्रसारमाध्यमातून बातम्या येत होत्या, पण सचिन पायलट यांनी असे जाहीरपणे कधी बोलले नव्हते पण स्वतःच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी आपल्याला चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याच कडेलोट झाला व सचिन पायलट यांनी वाळवंटात बंडाचे निशाण उभे केले. पायलट घराण्यातच याअगोदर राजेश पायलट यांनी पंतप्रधान नरसिंह राव व काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या विरुद्ध बंड केले होते व त्याचाच कित्ता त्यांचे चिरंजीव सचिन पायलट यांनी गिरवला आहे.

सचिन पायलेट हे वयाच्या २६ व्या वर्षी दौसा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले, व इतक्या लहान वयात केंद्रीय मंत्री झाले. त्यानंतर राजस्थान काँग्रेस अध्यक्ष व वयाच्या ४२ वर्षी राजस्थानचे उपमुख्यमंत्री इतकी पदे काँग्रेसने दिले पण इतक्यावर ते खूश नव्हते कारण लहान वयातच राजकारणातील खूप काही मिळाल्यानंतर त्यांच्या ही अपेक्षा वाढणे सहाजिकच आहे. अशोक गहलोत त्यांचा राजकारणातील अनुभव व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेच्या बळावर त्यांनी मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. पण पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवले असले तरी त्यांना त्यांचे जे काही साध्य करायचा आहे ते शक्य नाही कारण ज्यावेळी सचिन पायलट आमदारांना घेऊन दिल्लीला गेले त्यावेळी त्यांच्यासोबत पाच ते सहा आमदार उपस्थित होते. त्यावरून त्यांना किती आमदारांच्या सहयोग आहे हे दिसत होते व इतक्या आमदारांच्या बळावर सरकार पाडणे शक्य नाही. सदनातील सदस्यांची जर संख्याबळ पाहिले तर काँग्रेसकडे जवळपास १०७ आमदारांच्या सहयोग आहे विरोधी पक्ष भाजप कडे राहिलेल्या सदस्य याचा अर्थ १०७ काँग्रेस व मित्र पक्ष व अपक्ष मिळून १७ असे १२४ आमदारांचा काँग्रेसला सहकार्य आहे व भाजप ७२ व मित्रपक्षांच्या ४ असे पक्षीय बलाबल हे सचिन पायलट यांनी किती आमदार बरोबर घेऊन जावे व इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार फुटतील का हाही प्रश्न आहे. इतका मोठा खर्च आमदारांनी वरती करण्यात मध्यप्रदेश सारखी परिस्थिती राजस्थान मध्ये नाही या बंडामागे अमित शहा चिच फूस आहे हे जगजाहीर आहे. त्यातच मध्यप्रदेश ज्योतिरादित्य शिंदे सचिन पायलट यांची मैत्री याचा उपयोग करून राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे. तो फळाला येण्याची शक्यता कमीच आहे.

त्यातच काँग्रेसमध्ये तरुण नेत्यांची घुसमट होत आहे हेही एक कारण पुढे केले जात आहे. कारण त्यांच्याच पक्षाचे कपिल सिब्बल हे काँग्रेस पक्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढली जाते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे की तबेल्यातील सर्व घोडे पळून गेल्यावर ती उपाययोजना करणार काय ? आज काँग्रेसला गेली वर्षभर राष्ट्रीय अध्यक्ष नाही हंगामी अध्यक्ष लक्ष घालत नाहीत दुय्यम दर्जाचे नेते पाठवून बंडखोरांचे बोळवण करतात. हाच खरा राग बंडखोरांच्यात दिसून येतो. त्यामुळेच मध्यप्रदेश मध्ये शिंदेनी भाजपच्या तंबूत शिरून सत्ता स्थापन केली . त्यामुळे काँग्रेस पक्षाला वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा नाहीतर ते पण कपिल सिब्बल म्हणतात त्याप्रमाणे सगळेच घोडे तबेल्यातून पळून जातील.

सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचे जे स्वप्न पाहत होते ते वाळवंटातील मृगजळच वाटत आहे कारण काँग्रेस पक्षाने कडक निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे व त्यांच्या दोन समर्थक मंत्र्यांनाही राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आले आहे त्यामुळे काँग्रेस जाणून आहे की पहिला त्यांच्या मागे किती आमदार आहेत व ते जे पाहताहेत ते वाळवंटातील मृगजळ आहे.

अशोक कांबळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा