सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

पुणे १२ जानेवारी २०२४ : आज सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर बनली होती, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सौ.रजनीदेवी पाटील यांचा २६ जुलै १९४८ रोजी जन्म झाला होता. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणीर वंदन येथील असून त्यांचा चार पिढ्यांचा सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे घराण्यात जन्म झाला होता. त्यांचा विवाह १६ मे १९६८ रोजी श्रीनिवास पाटील यांच्याशी झाला. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम साथ दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा