राज्यसभेची निवडणुक १० जूनला होणार असं जाहीर होत असताना वाद विवादाला तोंड फुटत आहे. १० जूनला ही निवडणूक होणार असे चित्र असताना, कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे कदाचित निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील. असे विजय वडेट्टीवारांनी जाहीर केले. असे असताना या निवडणुकांच्या निर्णयांवर महाविकास आघाडी आणि विरोधी पण यांच्या प्रतिष्ठांची बाजी लागली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिक अशी चुरशीची लढत होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार आहे. मधल्या काळात संभाजी राजे या निवडणुकीत येणार, मग ते कुठल्या पक्षातून येणार या चर्चांना उधाण आले असताना त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे , असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. मात्र अमरावतीमध्ये तीन अपक्ष उमेदवारांनी मविआला पाठिंबा दर्शवला आहे.
हे असताना प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने पुन्हा नवीन प्रश्न उभे रहात आहेत. मुळात ही निवडणुक शिवसेना विरुद्ध भाजप नसून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी आहे. स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणले पाहिजे तरच सत्ता राखता येईल असे विधान आंबेडकरांनी केल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत. असे न झाल्यास राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते , असेही प्रकाश आंबेंडकरांनी सूचविले आहे.
राज्यसभेचा घोडेबाजारात कुठला पैसा वापरला जातो, हे ईडीने तपासून घ्यावे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. सध्या राज्यसभा आणि निवडणूक हे समीकरण कशा पद्धतीने पुढे जाते, कोणाची हार आणि कोणाची जीत हे काळच ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस