राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी घेतली जेऊर येथील मेंढपाळांची भेट

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील मेंढ्यांना आलेल्या देवीच्या रोग प्रकरणी माध्यामांनी दिलेल्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी आज जेऊर येथील धनगर वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून या रोगाबाबत माहिती घेतली.तसेच ज्या मेंढपाळांच नुकसान झाले आहे त्यांचे सांत्वन केल.त्यांना शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न करण्याच आश्वासन दिले.
गेल्या एक महिन्यापासून जेऊक परिसरातील मेंढ्यांना देवीच्या रोगाने ग्रासले आहे. मात्र यावर प्रशासनाच्यावतीने  गांभीर्याने उपाययोजना केल्या जात नव्हत्या. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या नंतर राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी याची गंभीर दखल घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याची तातडीचे आदेश दिले.
यामुळे परिसरात जिल्हाभरातून प्रशासन आज जेऊर येथे  दाखल झाले होते. यावेळी पुण्यातून आलेल्या वैद्यकिय  टीमने मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करून आजाराची निश्‍चिती केली. त्याचबरोबर महसूल विभागाने देखील मृत मेंढ्यांचे पंचनामे केले. आज सायंकाळी सहा वाजता नामदार भरणे जेऊय मध्ये दाखल झाले.
तत्पूर्वी प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झाली होती. भरणे यांच्या या तातडीच्या कारवाईमुळे मेंढपाळांमधुन  समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पशुसंवर्धन खातं त्यांच्याकडेच असल्याने पुढे जाऊन राज्यमंत्री  भरणे याबाबत काय निर्णय घेतात? येथील मेंढपाळांना कशा प्रकारचे मदत करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावेळी भरणे म्हणाले की, या ठिकाणी असलेली परिस्थिती पाहण्यासाठी मी आलो आहे. यापुढे  जेऊर आणि परिसरातील वीस किलोमीटरच्या अंतरा मधील मेढ्यांना लसीकरण करून या रोगावर नियंत्रण यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे टीम कार्यरत करणार असल्याचे तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाच्यावतीने अनुदान देता येते का? याबाबत  प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्याच बरोबर मेंढ्यावर उपचार करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशीअंती योग्य कारवाई केली जाईल असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सोमेश्वरचे उत्तम धुमाळ, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त शितलकुमार मुकणे,जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी शिवाजी विधाटे
, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी प्रमोद काळे आदी उपस्थित होते.

पंचनामे करण्यात गुंग…

राज्य मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पुरंदर मधील प्रशासन खडबडून जागे झालंय.आजपर्यंत  मेंढ्यांच्या मृत्यूचे पंचनामे न करणारे महसुल प्रशासन आज पंचनामे करण्यात गुंग झाले होते.तर पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा येथे येऊन शवविच्छेदन करताना दिसत होते.

या रोगावर नियंत्रण यासाठी जिल्ह्यातून एक स्वतंत्र टीम येथे दाखल झाली आहे . आता  या भागातील मेंढ्यांमध्ये लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेढपाळांनी योग्य त्या लसीकरण वेळोवेळी घ्याव्यात म्हणजे अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
-डाॅ. शितलकुमार मुकणे,
विभागीय उपायुक्त पशुसंवर्धन विभाग

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा