गोल पोस्ट राजकारण राज्यपाल कोश्यारींची होणार हकालपट्टी?

राज्यपाल कोश्यारींची होणार हकालपट्टी?

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
तसेच राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणाऱ्या कलराज मिश्र यांची महाराष्ट्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून हातची सत्ता गमावल्यानंतर केंद्राकडून प्रतिमा सुधारण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पहाटेच्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यपाल टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे कोश्यारी यांची दुसऱ्या राज्यात उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

error: Content is protected !!
Exit mobile version