राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते: शरद पवार

मुंबई : निवडणुका पार पडून जवळपास २० दिवस उलटून गेले. पण अजूनही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, लगेचच राज्यात निवडणूका होणार नाहीत असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

बहुमताचा आकडा भाजपा आणि शिवसेना युतीकडे आहे. आम्हाला जनतेनेच विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भाजपाने अद्यापही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. ५०-५० फॉर्म्युल्यावर अद्यापही शिवसेना अडून आहे. भाजपा सत्तेचा दावा करत नसल्याने राज्यपाल शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण देवू शकते पण तशी शक्यता धुसर दिसत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा