राज्यात सायबर संदर्भात ४१३ गुन्हे दाखल, २२३ व्यक्तींना अटक

मुंबई, दि. २५ मे २०२०: सध्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच व्हाट्सअप पोस्ट्समधून अफवा ,चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४१३ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०७ गुन्ह्यांची (ज्यापैकी २२ N.C आहेत) नोंद २३ मे २०२० पर्यंत झाली आहे.

सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७३ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्या प्रकरणी १६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २० गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४५ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २२३ आरोपींना अटक केली आहे.  यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट टेकडाऊन करण्यात यश आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा