मुंबई, 17 जानेवारी 2022: Omicron प्रकारामुळं, सप्टेंबर-डिसेंबर 2021 च्या तिमाहीत शेअर बाजारात काहीशी अस्थिरता होती. यादरम्यान काही विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) काही विक्री केली. तथापि, या काळात राकेश झुनझुनवाला, डॉली खन्ना आणि आशिष कचोलिया यांसारख्या अनुभवी गुंतवणूकदारांनी काही निवडक शेअर्समध्ये पैसा लावला. चला या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर एक नजर टाकूया:
झुनझुनवाला यांनी टायटनमधील भागीदारी वाढवली
प्राथमिक माहितीनुसार, बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत आयवेअर निर्माता टायटनमध्ये त्यांचा हिस्सा 5.09% पर्यंत वाढवला. झुनझुनवाला यांनी त्यांचा स्टेक 3.80 टक्क्यांवरून 4.02 टक्क्यांवर वाढवला. त्याचवेळी रेखा झुनझुनवाला यांचा स्टेक 1.07 टक्के राहिला. झुनझुनवाला यांनी या काळात Escorts मधील आपला स्टेकही 5.22 टक्क्यांपर्यंत वाढवला. तथापि, या कालावधीत झुनझुनवालांनी Aptech मधील आपली भागीदारी 24.33 टक्क्यांवरून 24.04 टक्क्यांवर आणली. त्याचप्रमाणं, Mandhana Retail Ventures मध्ये त्यांचा हिस्सा 7.39 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
डॉली खन्ना पोर्टफोलिओ
चेन्नईस्थित गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी तिसर्या तिमाहीत Ajanta Soya, Simran Farms, Control Print आणि Tinna Rubber and Infrastructure मध्ये आपला हिस्सा वाढवलाय. गेल्या तिमाहीत त्या या कंपन्यांच्या प्रमुख भागधारक नव्हत्या. खन्ना 1996 पासून देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांचा पोर्टफोलिओ पूर्णपणे त्यांचे पती राजीव खन्ना यांनी मॅनेज केला आहे. माहितीनुसार, खन्ना यांनी Talbros Automotive Components, Butterfly Gandhimathi Appliances, New Delhi Television आणि Nitin Spinners मध्ये त्यांचा हिस्सा वाढवलाय.
Kacholia ने लावले या शेअर्स वर पैसे
Trendlyne डेटानुसार, कचोलियाने सप्टेंबर-डिसेंबर तिमाहीत Genesys International, Igarashi Motors India, United Drilling Tools आणि Yasho Industriesचे शेअर्स खरेदी केले. डिसेंबर तिमाहीपूर्वी ते या कंपन्यांमध्ये मोठे भागधारक नव्हते. नुकत्याच सूचीबद्ध झालेल्या SJS Enterprisesमध्येही त्यांची 3.77 टक्के भागीदारी आहे. त्यांनी Kwality Pharmaceuticals, Xpro India, Ami Organics आणि Faze Three मध्ये आपला हिस्सा वाढवला. दुसरीकडं, त्यांनी मोल्ड-टेक पॅकेजिंग, वैभव ग्लोबल आणि विष्णू केमिकल्समधील आपला हिस्सा कमी केला.
डिसेंबर तिमाहीत वधारले टायटनचे शेअर्स
डिसेंबर तिमाहीत बीएसई सेन्सेक्स 1.48 टक्क्यांनी व बीएसई मिडकॅप 1.12 टक्क्यांनी वधारला. या काळात बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात 4.90 टक्क्यांची वाढ झाली. यावेळी टायटनच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली. 30 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 2,159.85 रुपयांवर होते, जे 31 डिसेंबर 2021 अखेर 2,524.35 रुपयांवर पोहोचले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे