राकेश झुनझुनवाला सुरू करणार नवीन एयरलाइंस, सरकारकडून मिळाला हिरवा कंदील

मुंबई, 12 ऑक्टोंबर 2021: भारतीय शेअर बाजाराचे दिग्गज राकेश झुनझुनवाला यांनी आता विमानचालन क्षेत्रात आपलं नाव प्रस्थापित करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa एअरलाइन्सला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालं आहे आणि ते सर्व अतिरिक्त अनुपालनांवर नियामकांसोबत काम करतील.

वास्तविक, एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे आणि Akasa एअर त्या अंतर्गत उड्डाण करंल. जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे या नवीन विमान कंपनीचे सीईओ असतील. त्याची उड्डाणं 2022 च्या उन्हाळ्यापासून सुरू होतील. राकेश झुनझुनवाला यांची या विमान कंपनीत मोठी गुंतवणूक आहे. या विमानसेवा सर्वात स्वस्त भाडे आकारतील.

विनय दुबे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, “अकासा एअरला एनओसी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाचा मी आभारी आहे. अकासा एअर यशस्वीपणे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अतिरिक्त अनुपालनांवर नियामक प्राधिकरणासह काम करणेशं सुरू ठेवेल. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष यांचा या नवीन विमान कंपनीच्या संचालक मंडळात समावेश आहे. विनय दुबे आणि त्यांच्या टीमला कंपनीकडून सरकारकडून एनओसी मिळाल्याबद्दल अभिनंदन.”

राकेश झुनझुनवाला यांची या नवीन विमान कंपनीमध्ये सुमारे 40 टक्के भागीदारी असू शकते, ते या उपक्रमात 35 मिलियन डॉलर गुंतवण्याचा विचार करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, एअरलाईन 2022 च्या उन्हाळ्यात भारतात ऑपरेशन सुरू करू इच्छित आहे. येत्या 4 वर्षात विमान कंपनीमध्ये 70 विमाने समाविष्ट करण्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अकासा एअर विमान खरेदी करण्यासाठी बोईंग आणि एअरबससोबत चर्चा करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा