उस्मानाबाद, ३ ऑगस्ट २०२० : राखी पौर्णिमा हा सण बहीण भावाच्या नात्यातील अत्यंत प्रेमळ असणारा सण आहे. आजच्या दिवशी सर्वत्र बहीण भावांची किलबिल चालू असते. एक राखी बांधून बहीण भावाच्या रक्षणाची प्रार्थना करते, आणि भाऊ त्याच्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः स्वीकारतो. अशा या रक्षाबंधनाचे खूप किस्से आपण आजवर ऐकत आलेलो आहोत.
आपली जो रक्षा करतो, त्याला राखी बांधली जाते. फक्त माणूसच नाही तर हा निसर्ग देखील आपली रक्षा करतो. यामुळे, उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगाचे अनुकरण करीत, आज झाडाला राखी बांधून आपले निसर्ग प्रेम व्यक्त करत, हा रक्षाबंधनचा सण साजरा केला.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड