गोल पोस्ट गुन्हा राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२३ :गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत बरीच चर्चेत आली आहे. कधी पती आदिलमुळे तर कधी आईच्या आजारपणात राखी बरीच चर्चेत होती. दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिने आदिलसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. तिने आपले लग्न टिकणार नसल्याचे ही सांगितले होते. त्यातच आता ओशिवारा पोलिसांनी आदिलला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राखीने पती आदिल खानवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप ठेवत ही तक्रार दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आदिलला अटक केली. राखीने पती आदिलच्या गर्लफ्रेंडबद्दलही खुलासा केला होता.

राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते. सोमवारी तिचे काही व्हिडिओही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये राखीने आदिलवर हे आरोप केलेत. पोलिसात तक्रार दाखल करण्याआधी तिने माध्यमांना असे सांगितले की आदिलने तिच्याच घराच्या चाव्या तिच्याकडून हिसकावून घेतल्या आणि त्या देण्यासाठी तो नकार देतोय. तिने असाही आरोप केला की आदिल तिला त्रासही देतो. बॉलिवूडमध्ये नाव मिळवण्यासाठी त्याने माझा वापर केला. तसेच तिच्याकडील पैसे आणि सोनेही त्याने घेतल्याचा राखीचा दावा आहे.

राखीच्या तक्रारीनंतर कलम ४०६ आणि ४२० च्या अंतर्गत आदिलवर गुन्हा दाखल करण्या आला असून, आता आदिलला अटक करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version