गोल पोस्ट इतर वकील व्हिक्टोरिया गौरी विरोधातील याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वकील व्हिक्टोरिया गौरी विरोधातील याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, ७ जानेवारी २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने वकील लक्ष्मणचंद्रा व्हिक्टोरिया गौरी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. कॉलेजियमने केलेली शिफारस रद्द करण्याची मागणी सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी केली. न्यायमूर्ती पदाची शपथ घेणाऱ्यांचा घटनेवर विश्र्वास असावा; पंरतु संबंधिताकडून करण्यात आलेल्या सार्वजनिक मतप्रदर्शनामुळे त्यांची शिफारस रद्द करण्यात यावी, असा युक्तिवाद रामचंद्रन यांनी केला.

अनेक प्रकरणांमध्ये खराब कामगिरीमुळे अतिरिक्त न्यायमूर्तींना स्थायी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आले नाही. तर विशेष राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांना न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती मिळाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. याचिकाकर्त्याच्या वतीने सादर करण्यात आलेले तथ्य २०१८ मध्ये देण्यात आलेल्या भाषणाशी संबंधित आहेत. कॉलेजियमने व्हिक्टोरिया गौरी यांच्या नावाची शिफारस करण्यापूर्वी याबाबत विचार केला असेल, असे न्या. संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले.

गौरी या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महासचिव राहिल्या आहेत, असा दावा २०१९ मधील एका ट्विटचा दाखला देत करण्यात आला होता. गौरी यांच्यावर ख्रिश्चन; तसेच मुस्लिम समाजाविरोधात कथित वक्तव्य केल्याचा आरोप असल्याचा उल्लेख देखील याचिकेतून करण्यात आला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version