Delhiites praise ‘Aryans Group of Companies: आजच्या नवीन तंत्रज्ञानच्या युगात बऱ्याच कंपन्या पैसे कमावतात, पण सामाजिक कामासाठी पैसे देण्याची प्रवृत्ती फार कमी कंपन्यांकडे आणि लोकांकडे असते. मात्र आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख मनोहर जगताप यांनी ते करून दाखवल्याची भावना दिल्ली येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केल्या. तसेच आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचा सामाजिक क्षेत्रासाठी असाच कायम हात पुढे राहो आणि त्यांचा आदर्श इतरांनी घेवो,अशा शब्दात त्यांनी आर्यन्स ग्रुपला शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या वतीने विविध संस्थाना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या वेबसाइटचे लुकअप करण्यात आले. त्यावेळी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ने आजवर केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री रक्षा खडसे, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर,अभिनेते सयाजी शिंदे, उमा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता जागताप आणि कंपनीचे सेवासर्वे मनोहर जगताप यांच्यासह आदी प्रमुख मंडळी यावेळी उपस्थित होते.


उपस्थित कार्यक्रमात रक्षा खडसे म्हणाल्या की, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ ने सामाजिक कामापासून चांगली सुरुवात केली आहे.आपण कितीही मोठ्या पदावर गेलो तरी सामाजिक कामाची जाणीव जो ठेवतो, त्याला मदत करण्यात कोणीच हात आखडता घेत नाही. यामुळे जगताप यांनी सरकारकडे जी अपेक्षा ठेवली आहे. ती नक्कीच पूर्ण करण्यात येईल.”मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याच्या मागे उभ राहण्याचा अभिमान प्रत्येकाला असेल” अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. पुढे राजस्थानचे खासदार रेजेंद्र गेहलोत म्हणाले की, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज व्यवसायाबरोबरच सामाजिक,ऊर्जा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे.त्यामुळे त्यांना नक्कीच सहकार्य करण्यात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर