झाडांना व पाळीव प्राण्यांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे..!

वाघोली ३ ऑगस्ट २०२० : भविष्यात झाडेच आपले रक्षण करणार आहेत या भावनेतून बकोरी येथील माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या परिवारातील सदस्यांनी झाडांना व घरातील पाळीव प्राण्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

सध्याच्या काळात खर्‍या अर्थाने जनावरे व झाडे अडचणीच्या काळात भाऊ म्हणून आपले रक्षण करणार आहेत त्यामुळे त्यांना भाऊ म्हणून राखी बांधली व कोरोना मुळे बरेच भाऊ – बहिणी एकमेकांकडे जाऊ शकले नाही त्यामुळे अशा प्रकारे रक्षाबंधन साजरे केल्यामुळे आम्हाला खूप समाधान मिळत असल्याचे वारघडे यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा