राम मंदिर भूमीपुजन, असदुद्दीन ओवेसींची पोटदुखी……

नवी दिल्ली, ३० जुलै २०२०: भारत हा संस्कृती प्रधान देश असून भारताला हिंदू धर्माच्या संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभला आहे. भारतात आजही सर्वात पवित्र हिंदू धर्म असून, तो श्रेष्ठ आहे. त्यात प्रत्येक भारतीयांच्या आत्मियतेचा मुद्दा म्हणजे आयोध्येचा राम मंदिर होय. भारतात अनेक हिंदू मुस्लिम वाद दंगली उसळल्या पण त्या सर्वात मोठी दंगल म्हणजे बाबरी मशिद आणि राम मंदिर होय.

त्या नंतर हा राम मंदिर बाबरी मशिद मुद्याचा वाद कोर्टात गेला आणि निकाल हा रामलल्लाच्या बाजूने लागला. त्या नंतर भारतात एकच जल्लोष निकाला नंतर साजरा करण्यात आला. तसेच बाबरीवर आन्याय नको म्हणून मुस्लिम समाजाला कोर्टाने ५ एकर जमिन हि मशिद बांधण्यासाठी सुद्धा दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आयोध्येत राम मंदिराचा पाया अर्थात भूमी पुजन होणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता २०० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.

असदुद्दीन ओवेसींची खद्खद्……

राम मंदिरच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयमचे नेते असदुद्दीन ओवेसीच्या पोटात दुखत असल्याची भावना समोर आली आहे. आयोध्येत ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यावर ओवेसी यांनी एक व्यक्तव्य करत आपली भूमिका मांडली आहे.”कायदेशीरदृष्ट्या सर्वात वर असलेल्या सर्वोच्च न्यायालाने हा निर्णय दिलाय पण मी जिंवत असे पर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही. तिथे एक मशिद होती आणि ती पाडली गेली नसती तर हा भुमीपुजनाचा कार्यक्रमच झाला नसता” असे ही ते बोलले आहेत. त्यांच्या या मत मांडणी वरुन ओवेसी हे आतून चवताळले आहे असे दिसतयं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा