रामभाऊ खडके यांचा “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार” देऊन गौरव

26

अमरावती, दि.२४ मे २०२०: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी मेळघाट (चिखलदरा) मधील  कुलांगणा गावातील शेतकरी रामभाऊ खडके यांना “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

हा गौरव सोहळा राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे यांच्या शुभहस्ते घेण्यात आला.

यावेळी रामभाऊ खडके यांना पुरस्कार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ व मानधन प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या पोलट्री फॉर्मला भेट देऊन त्यांना सर्व उपस्थितांनी शुभेच्छा प्रदान केल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी: