मुंबई : आंबेडकरी विचारधारेच्या अनुयायांना दहशतवादी संबोधणाऱ्या रामदेवबाबा यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये कारवाई करावी, अशी मागणी करावी, अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, नगरसेविका आरती गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
रामदेवबाबा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रामास्वामी पेरियार हे वैचारिक दहशतवादाचे जनक असल्याचे म्हटले होते. त्यांची विचारधारा मानणारे लोकही दहशतवादी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास हावळे, आरती गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांची भेट घेतली.