मुंबई, २४ फेब्रुवरी २०२१: देशभरात कोरोनाचे संकट आधिक गडद होताना दिसत आहे. त्यात भारतात कोरोना लसीकरणला सुरवात झाली आहे.टप्याटप्याने कोरोना वरील लस देण्याचे काम सध्या भारतात सुरू आहे. सध्या फ्रंटलाईन वाॅरीयर अर्थात डाॅक्टर आणि नर्स आरोग्य करण्यार्यांना हि लस घेण्यात येत आहे.
अश्यातच बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे कोरोनील औषधाच्या वापराला अनेक प्रश्नांच्या भवर्यानंतर परवानगी देण्यात आली आहे. पण बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे कोरोनील हे औषध महाराष्ट्रात मात्र विकले जाणार नाहीये. त्यासाठी राज्य सरकारनेच या औषधीची विक्री महाराष्ट्रात करण्यार नसल्याचे सांगितले आहे.
पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर IMA ने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणाम कारक आसल्याचा पतंजलीचा दावा फेटाळला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने, IMA व इतर संबंधीत सक्षम आरोग्य संघटनेकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
तर राज्यातील गृहमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणावर दोन गट पहायला मिळत आहे. ज्या मधे एक गट या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहे.तर दुसरा गट हे जाणीवपूर्वक केले जात असल्याची टिका सरकारवर करताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव