नवी दिल्ली, ०५ ऑगस्ट २०२० : राम मंदिर बांधण्याच्या कामाच्या उद्घाटनाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी सर्वांचे अभिनंदन करताना सांगितले की, मंदिर परिसर रामराज्याच्या विचारांवर आधारित आधुनिक भारताचे प्रतीक बनेल.
ट्विटरवर कोविंद यांनी (हिंदीमधून भाषांतरित) लिहिले, “राम मंदिर बांधकामाच्या उद्घाटनाबद्दल सर्वांचे अभिनंदन! मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम यांचे मंदिर न्यायाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आणि सार्वजनिक आणि सामाजिक समरसतेच्या उत्साहाने बांधले जात आहे. रामराज्याच्या आदर्शांवर आधारित मंदिर संकुल आधुनिक भारताचे प्रतीक बनेल असा माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत राम मंदिर ‘भूमिपूजन’ केले.
अयोध्येत पीएम मोदी यांनी प्रथम हनुमान गढी मंदिरात जावून रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतले आणि पंतप्रधानांनी या मंदिरात प्रथमच भेट दिली होती. राम जन्मभूमीला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान देखील आहेत. या प्रसंगी पंतप्रधानांनी फलकांचे अनावरण तसेच श्रीरामजन्मभूमी मंदिरावरील स्मारक टपाल तिकिटही जाहीर केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: