मुंबई: एस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि प्रवर्तक कंपनीच्या प्रमोटर कंपनी एस कॅपिटल व मॉर्गन क्रेडिट्स बँकेतील उर्वरित ०.८ टक्के हिस्सा विकला आहे. त्यामुळे येस बँकेवरील राणा कपूर यांचे नियंत्रण संपुष्टात आले आहे.
येस बँकेच्या प्रवर्तकांनी १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या येस बँकेचा हिस्सा म्हणजेच २.०४ कोटी सहभाग खुल्या बाजारात विकले आहेत. त्यामुळे राणा कपूर यांच्याकडे येस बँकेचे फक्त ९०० सहभाग राहिले आहेत. राणा कपूर यांनी येस बँकेतील आपला पूर्ण हिस्सा विकल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजारात येस बँकेच्या समभागात २.५१ टक्क्यांची घसरण होऊन दिवस अखेर ६४.२० रुपये प्रति सहभाग या पातळीवर होता. याआधी २६ ते २७ सप्टेंबर च्या दरम्यान येस कॅपिटल, मॉर्गन क्रेडिट्स आणि राणा कपूर यांनी एकत्रितरित्या येस बँकेचे ५.५२ कोटी सहभाग म्हणजेच बँकेतील २.१६ टक्के शिष्याची खुल्या बाजारात विक्री केली होती.