नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली आहे.
येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी दिवसभर कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत कपूर यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. अधिक तपासासाठी मध्यरात्रीनंतर कपूर यांना अटक करण्यात आली आहे.
येस बॅँकेच्या आर्थिक नुकसानीला राणा कपूर जबाबदार असल्याचे ईडीच्या चौकशीतून समोर आले आहे.
आज सकाळी ११ वाजता कपूर राणा कपूर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.