बिहारची रणधुमाळी

8

पाटणा, ११ नोव्हेंबर २०२०: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार निवडणूकीचा निकाल पहाटे ३ वाजता लागला. ज्या मधे एनडीए’नं पुन्हा एकदा बाजी मारली.एनडीए आणि महागठबंधन मधे कांटे की टक्कर होताना दिसली. २४३ जागांपैकी १२५ जागांवर एनडीए’नं विजय मिळवला, तर ११० जागांवर महागठबंधनला समाधान मानावं लागलं. ८ जागा या इतर पक्षाला गेल्या.

नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेणार

बिहार विधानसभेत एनडीएला स्पष्टपणे बहुमत मिळालं. एनडीए मधे भाजप जरी मोठा पक्ष असला तरी आधी ठरल्याप्रमाणं नीतीश कुमार मुख्यमंत्री होणार आसल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. तर २०००, २००५, २०१०, २२ फेब्रुवारी २०१५, २० नोव्हेंबर २०१५, जुलै २०१७ अशा शपथा नितीश कुमार यांनी घेतल्या आहेत. तर ते यावेळी शपथ घेतील ती त्यांची सातव्यांदा शपथ होईल.

…तर शिवसेनेचे मानावे आभार

यंदा एनडीए मधे नितीश कुमारच्या जेडीयुला जास्त जागा मिळाल्या नाहीत. त्यांना ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर भाजपला ७४ जागा भेटल्या आहेत. ज्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजप नेत्यांनी आपण मोठे भाऊ असून मुख्यमंत्री नितीश कुमारलाच करू असं विधान केलं. कमी जागा मिळून ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. ज्या मधे राजकीय अनेक नाटके घडली. ज्यातून भाजपनं तो धडा घेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केलं तर त्यांनी शिवसेनेचे धन्यवाद केले पाहीजे असं शिवसनेने म्हटंले आहे.

बिहार मधे ओवेसींच्या पक्षाची जोरदार मुसंडी

बिहार विधानसभेच्या निवडणूकीत खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षानं नेत्रदीपक यश मिळवलं आहे. एक्झिट पोल नुसार या पक्षाला ० ते १ जागांनर विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, सीमाचंल मधे पक्षानं मुसंडी मारत ५ जागा जिंकल्या. या जागा मोठ्या बहुमतांनं निवडून आल्या. तर यावेळी एमआयएम’नं एकूण २० जागा लढवल्या होत्या.

बिहार मधे कम्युनिस्ट पक्षांनी ही मारली बाजी

बिहारच्या विधानसभेच्या रणधुमाळी मधे कम्युनिस्ट पक्षांनी ही चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस सोबत महागठबंधनमधे गेल्यावर कम्युनिस्ट पक्षांनी २९ पैकी १६ जागांवर तिन्ही कम्युनिस्ट पक्षांनी विजय मिळवला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया( मार्क्सवादी-लेनिनिस्ट)(लिबरेशन) पक्षानं १२ जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं २, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं २ जागा जिंकल्या आहेत. या मुळं बिहार मधे चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

तेजस्वी यादव ने केली दमदार कामगिरी, पण त्यांनी नितीश कुमार वर केले आरोप

यंदाच्या बिहार निवडणूकीचा तरूण चेहेरा म्हणजे आरजेडी चे तेजस्वी यादव.तेजस्वी यादव यांनी एनडीए ला एक कडक टक्कर दिली.आणि येणा-या काळात आपण अजून झुंझार निवडणूक लढून विरोधकांसाठी एक मजबूत पक्ष म्हणून उदयास आले आहेत. तर दुसरीकडे बिहार मधे विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू आसून, आमचे विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आले,असा आरोप राजद चे नेते तेजस्वी यादव यांनी केला. तसेच त्यांनी ११९ उमेदवारांची यादी ट्विटवर शेयर केले. हे सर्व उमेदवार विजयी आहेत मात्र आता त्यांना प्रमाण पत्र दिले जात नाहीये, नितीश कुमार मतमोजणी मधे ढवळाढवळ करत आहेत.असा आरोप तेजस्वींनी केला आहे.

काँग्रेस मुळे तेजस्वी सत्तेपासून वंचित

राजकीय तज्ञांनुसार, काँग्रेसच्या खराब कामगिरी मुळे तेजस्वी यादव हे सत्तेला मुकले आसे सांगण्यात येत आहे.२०१५ ला काँग्रेसला ४० जागा देऊन देखील त्यांनी २७ जागा निवडून आणल्या होत्या तर यंदा ७० जागा देऊन त्यांनी १९ जागाच जिंकल्या ते फक्त काँग्रेसच्या खराब कामगिरी मुळे.

शिवसेना काँग्रेस मधे कडवाहट

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी आपलं तोंड बंद ठेवावे असे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं २२ जागा लढवल्या होत्या ज्या मधे त्यांना २१ जागांवर नोटा पेक्षा ही कमी मते पडली आहेत. ज्यामुळे त्यांची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.त्यामुळं शिवसेनेनं तोंड बंद करावं अशी संजय निरूपम यांनी टिका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले

एनडीए ला स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून जनतेचे आभार मानले आहेत. बिहारच्या जनतेनं विकासाला प्राधान्य दिले.बिहारच्या गावे-गरीब, शेतकरी-मजूर, दुकानदार अश्या प्रत्येक वर्गानं एनडीए’च्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्रावर विश्वास ठेवला. प्रत्येक नागरिकाला आश्वासन देतो, बिहारच्या संतुलित विकासासाठी झोकून देऊन सातत्यानं काम करू असं ते म्हणाले.

बिहारच्या निवडणूकीच्या रणधुमाळीतील काही खास गोष्टी

नितीश कुमार छोटा तर भाजप मोठा पक्ष

तेजस्वी यादव सारख्या युवा नेत्याचा उदय तसेच राजद हा तगडा विरोधी पक्ष म्हणून भाजप जदयुला मिळाला

असदुद्दीन ओवेसीला वगळून चालणार नाही,हा राजद आणि काँग्रेस ला स्पष्ट संदेश,एमआयएम ने जिंकल्या ५ जागा

कम्युनिस्ट पक्षांची जोरदार मुसंडी २९ पैकी १६ जागांवर विजय

लोक जनता शक्तीचे चिराग पासवान यांनीदेखील युवा नेता म्हणून सोडली छाप

बिहारच्या या विधानसभेच्या निवडणुकीने यावेळी देशातील राजकारणाला अनेक गोष्टी शिकवून गेली.तर नितीश कुमार हे एनडीए कडून मुख्यमंत्री होणार असले तरी त्यांना काँग्रेस ने आपल्या बरोबर सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली ज्या मुळे निकाल जरी लागले तरी राजकरण हे संपले नसून अजून काही घडामोडी घडू शकतील का?हा प्रश्न उपस्थित होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा