मुंबई, दि.२३ मे २०२० : राणे तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखून वक्तव्य करावे. खरतर तुम्हाला मी सुद्धा ओळखत नव्हते. तुमच्या वडीलांमुळे तुमची ओळख झाली. तेव्हा मानसिक संतुलन गमावल्यासारखं वागू नका नाहीतर आंबेडकरी जनता इलाज चांगला करते. ज्याचा अनुभव तुम्ही घेतलाय मागच्या दोन दिवसात, असे दिशा शेख यांनी माजी खासदार निलेश राणे यांना चांगलीच तंबी दिली आहे.
राजकीय वर्तुळात सध्या चुकीचा शब्दप्रयोग केल्याने भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे हे टीकाकारांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यात आता वंचित आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी देखील निलेश राणे यांना मर्यादा ओळखून वक्तव्य करण्याचा सल्ला दिल्याने वातावरण अजून तापायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, निलेश राणे यांनी एक राजकीय ट्विट करताना “हिजडा” असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे तृतीयपंथी समाजाने त्यांच्या या शब्दावर आक्षेप घेतला होता.
यावरून वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना शब्द मागे घेऊन समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता.
त्यावर राणे म्हणाले होते की, एरवी प्रकाश आंबेडकर काय बोलतात मीच काय , महाराष्ट्र पण लक्ष देत नाही, पण साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो की, आपण २०१९ दोन ठिकाणी लोकसभेला उभे होतात आणि मी १ ठिकाणी तरी तुम्ही दोन्ही मतदारसंघात दीड/पावणे २ लाख मतं घेतली आणि मी एकाच मतदार संघात २ लाख ७८ हजार मते घेतली. माहितीसाठी सांगितलं. राणेंच्या या ट्विटवर दिशा शेख यांनी हे उत्तर दिल्याचे समजते आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: