राणे विरुद्ध ठाकरे, राऊत

मुंबई ९ जुलै २०२१:  केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ज्यात नारायण राणे यांची वर्णी लागली. मात्र एकेकाळी शिवसेनेचे खंदे वीर असलेल्या नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला काय आणि त्यांना मंत्रीमंडळात जागा मिळाली काय… हा सगळा खेळ भाजपमुळे झाला अस, मत सर्वसामांन्याचं झाल. नारायण राणे यांचा शपथविधी झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना फोनवरुन अभिनंदक तेलं. पण उद्धव ठाकरे यांनी मात्र कुठलीच सामाजिकता न बाळगता केवळ अभिनंदन ही न करावे. त्यामुळे त्यांचे मन मोठे नाही, असा एक टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पण त्याला प्रतिउत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणेंना कमी महत्त्वाचे मंत्रिपद मिळाले, असे सांगितले. त्यालाही राणेंनी प्रतिउत्तर देत सांगितले की, कोणतेही खाते कमी महत्त्वाचे नसते. उलट ते काम करुन कसे मोठे करता येईल याचा विचार करण ही गरज आहे, हे त्यानी स्पष्टपणे सांगितेल. त्यातूनच आपण शिवसेनेबरोबरचा वाद विसरला नसल्याचं ही दाखवून दिलं.
इकडे ठाकरे सरकार शिवसेना नेत्यांना सांगत आहे, की घराघरात पोहोचा. सत्तेची चिंता नको. असं म्हणून त्यांना नक्की काय दर्शवायचं आहे, हेच समजत नाही. पण आता यावरुन सिद्ध झाले की शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणेंची भाजपातून भरभराटच झाली. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांच्या मनात नक्की काय चाललय?  हे समजणं नक्कीच औत्युक्याचं ठरेल. पण त्याचबरोबर कोकणच्या बालेकिल्ल्यात राणे पिता-पुत्र भाजपची घौडदौड वाढवणार हे मात्र नक्की. एकुणातच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार किमान महाराष्ट्रात आमने-सामने आले, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा