महाड,२५ ऑगस्ट २०२१ : महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घटना म्हणून नारायण राणेंची अटक मोहिम म्हणावी लागेल. अटकेनंतर राणेंना महाड कोर्टात दाखल करण्यात आलं.त्यांच्या अर्जावर दिवाणी कोर्टात सुनावणी सुरु झाली.सिनेमातल्या घटनांप्रमाणे हे चक्र सुरु आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही .
राणेंना कोर्टात दाखल करुन त्यांना मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं असून त्यांची सुनावणी सुरु झाली.कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरु झाली होती.त्यांच्या सोबत प्रसाद लाडबरोबर असून दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरु झाली.
यात पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली.हा पोलिसांचा युक्तीवाद होता.जेणेकरुन जनआशिर्वाद यात्रेला स्फोटक रुप येण्याची शक्यता होती.यासाठीचा हा मार्ग पोलिसांनी काढला होता.पण एका मंत्र्याला कोठडी देणे शक्य नाही, असं वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदूर्गात ७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राणे कुटुंबिय कोर्टाच्या आवारात जमा झाले होते.
४० मिनिटे सुरु असलेल्या या युक्तीवादात राणेंना जामिन द्यावा असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. राणेंचे वक्तव्य सार्वजनिक ठिकाणी केलं असून असं वक्तव्य कायम केलं जातं. तसेच राणेंची प्रकृती पाहता त्यांनी जामिन द्यावा असा युक्तीवाद राणेंच्या वकिलांकडून केला गेला. तर मुख्यमंत्र्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न राणेंनी केला असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
अखेरीस राणेंना महाड कोर्टाने जामिन मंजूर केला असून या नाटकावर पडदा पडला.
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांना जामिन मंजूर करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला . मात्र निलेश राणे यांनी शांत रहाण्याचं आवाहन त्यांना केलं. अखेरीस महाराष्ट्राच्या इतिहासातल्या या नाटकावर पडदा पडला आणि प्रकरण १ संपले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस,