रांजणगाव : येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे ग्रामस्थांनी कँडल मार्च काढण्यात आला.
निर्भया खटल्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी. महिला अत्याचार संबंधी खटले जलदगती न्यायालयात चालवावे. न्यायालय व पोलीस विभागातील रिक्त जागांची त्वरित भरती करावी. न्यायालयीन मानकांचे उत्तरदायित्व बिल २०१० त्वरित पास करावे, आदी मागण्यांसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगण सिध्दी येथे मौन आंदोलन सुरू आहे.
आंदोलनास पाठिंबा व समर्थनार्थ पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे ग्रामस्थांतर्फे शांततेत कँडल मार्च काढण्यात आला. महागणपती समोर कँडल लावून समर्थन रॅलीचा समारोप केला.
: येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे ग्रामस्थांनी कँडल मार्च काढण्यात आला.