गोल पोस्ट राजकारण रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माढा दि.९ मे २०२०: महाराष्ट्र विधानपरिषद आगामी निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील युवा नेतृत्व, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी भाजपकडून निश्‍चित करण्यात आली आहे.त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्याबाबत अधिकृत वृत्त येताच माढा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्ष नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून भाजपा राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या सहीने महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीसाठी ४ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.त्यामध्ये प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version