गोल पोस्ट कृषी राज्यातील मका आणि ज्वारीच्या खरेदीस केंद्र सरकारची परवानगी

राज्यातील मका आणि ज्वारीच्या खरेदीस केंद्र सरकारची परवानगी

मुंबई, दि. ९ मे २०२०: केंद्र सरकारकडून राज्यातील मका आणि ज्वारीच्या खरेदीस परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

त्यानुसार आता राज्याला २५ हजार मेट्रीक टन मका आणि १५ हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे.

याबाबत कृषिमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. राज्याने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने परवानगी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात ह्या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी धोरणानुसार भारत अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशीक शाखेमार्फत खरेदी केली जाणार असून खरेदी केलेले हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ग्राहकांना वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version