बलात्कार केला, पाय मोडले, गुप्तांगात जखमा ही आढळल्या…..

उदैती, ७ जानेवारी २०२१: देशाला पुन्हा एकदा हदरवून सोडणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हि घटना असून बदाऊन जिल्ह्यात घडली आहे. अत्यंत खळबळजनक बलात्कार असून पुन्हा एकदा अश्या विकृतीने माणुसकी वर देखील प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. बलात्कार ही समाजाला लागलेली एक अशी वाळवी आहे जी कडक कायद्या शिवाय हद्दपार होणार नाही.

उदैतीमधे पुजेला गेलेल्या ५० वर्षीय अंगणवाडी सेविकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरधमांनी इतक्या विकृतीने महिलेवर अत्याचार केला कि यामधे पिडतेला वेदना असाह्य झाल्या आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पिडितेच्या गुप्तांगात जखमा आढळून आले आहेत. तर तिचे पाय देखील या घटनेत मोडल्याचे समजले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एका पुजार्याने महिलेचा मृतदेह घरी आणल्याचे पिडित कुटुंबीयांनी सांगितले आहे.

अश्या विकृतीच्या किळसवाण्या घटनेमुळे परिसरात संताप तर व्यक्त होतच आहे. मात्र या बलात्कारामुळे मुलीच नाही तर विवाहित महिलेंचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वारंवार होणाऱ्या बलात्काराच्या घटनेकडे सरकार ने लक्षपूर्वक आणि गंभीर विचार करण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा