शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; चाकूचा धाक दाखवून लुटले

पुणे, १७ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी सोलापूर येथील रहिवासी उत्तम प्रकाश खंदारे (वय ६५) व त्यांचे साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी; तसेच उत्तम प्रकाश खंदारे यांच्या महिला सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण बी रेस्ट हाऊस, बिबवेवाडी येथे २०१२ मध्ये सुरू झाले आणि त्यानंतरही सुरूच राहिले. तब्बल ११ वर्षांनंतर पीडित महिला तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात आली.

खंदारे यांनी लग्नाच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. खंदारे यांनी तिच्या मुलाची पूर्ण काळजी घेण्याचे वचन दिले होते. मात्र, मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांनी दिलेला चेक बाऊन्स झाला. यानंतर खंदारे यांनी महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. खंदारे हे तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडामंत्री होते. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते तीनवेळा आमदार झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे यांनी लग्नाचे नाटक करून पीडितेला तिच्या मुलाची पूर्ण काळजी घेण्याचे आश्वासन दिले. अशाप्रकारे खोटे आश्वासन देत पीडितेला बी रेस्ट हाऊसमध्ये बोलाविले. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदार महिलेने कशीतरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला; पण उत्तम खंदारे हे भांडणात उतरले आणि बलात्कार केला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा