कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु

सांगली, १० ऑगस्ट २०२२: गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी २३ फुटांवर पोहोचली आहे. कृष्णा नदीतुन पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ सुरू असल्यामुळे अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेक्सने पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून सांगलीकरांना सतत पूराच्या पाण्याचा विळखा बसून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगलीकरांना याचा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी सांगली जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरल्यानंतर अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो त्यामुळे कर्नाटकातील नद्यांनाही पूर येतो. सांगली जिल्ह्यात पाणीपातळीत वाढ झाल्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून आपत्कालीन यंत्रणेलाही पाचारण करावे लागते. अलमट्टीतून वाढवलेल्या निसर्गाने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

शिराळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरने भरण्याच्या दिशेने पाणीवाढ होत आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी २३ फुटांवर पोहचली आहे. तर दुसरीकडून अलमट्टी धरणातून दिड लाख क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा