राशिभविष्य

मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ आज सहकाऱ्यांशी मिळून मिसळूनच कामे होतील. अहंकाराची बाधा नको. प्रसंगी विरोधकांनाही चहा पाजणे गरजेचे राहील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.


वृषभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७ पैशाची कमतरता नसल्याने चैनी व विलासी वृत्ती जोपासता येईल. काही रसिक मंडळी सहकुटुंब सहलीचे बेत आखतील. आज प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.


मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ कार्यक्षेत्रात काही हितशत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल. नवीन ओळखीत विश्वास ठेवणे हिताचे नाही.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. भिडस्तपणा नको.


कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ८ आज काही घरेलू प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्याल. काही दूरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हितसंबंधात सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील.


सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ९ आवक मनाजोगती असली तरी पैशाची उधळपट्टी टाळणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसायात जाहीरातींवर खर्च करावा लागेल. शेजारी आपलेपणा दाखवतील.


कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७ आज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. गरजुंच्या मदतीस धावून जाल. आज भावंडात मात्र काही क्षुल्लक मतभेद संभवतात.


तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : १ उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. प्रतिष्ठीतांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षांना खतपाणी मिळेल. आज विवाहविषयक बोलणी सामंजस्याने पार पडतील.


वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ५ नोकरी व्यवसायात चढाओढ वाढली आहे.गुंतवणूक करताना झटपट लाभाचा मोह टाळा. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वाद टाळा.


धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३ अचानक हाती आलेला पैसा तुमची उमेद वाढवेल. व्यवसायात उद्दीष्टे सहज पूर्ण झाल्याने मनावरील काळजीचे सावट दूर होईल. इच्छापूर्ती होईल.


मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ४ नोकरदारांना वरीष्ठांच्या खोचक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. अधिकारांचा गैरवापर टाळा. कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. दैवाची साथ लाभेल.


कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६ कार्यक्षेत्रात कितीही अडचणी आल्या तरी दैव आज तुमच्याच बजूने आहे. प्रामाणिक प्रयत्न कारणी लागतील. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न राहील.


मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : २ कोणतेही धाडस टाळा. आपल्या सुरक्षेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरूणांनी मर्यादा सांभाळाव्या. नीतीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा