राशिभविष्य

मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : ७ अती उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार आज दुपारनंतरच करा. वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजतील.


वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ३ कितीही पैसा आला तरी तो जाण्याचे मार्गही आधीच तयार असतील. जमाखर्चाचा तराजू समतोलच राहील.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. कुसंगती टाळाच.


मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ नोकरीत कामाशी प्रामाणिक असाल. आज आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. वरीष्ठही तुमच्या अडचणी समजून घेतील.


कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५ उद्योगधंद्यात मेहनत व चिकाटीच कामी येईल. मोठी स्वप्ने बघताना वास्तवाचे भान असणेही गरजेचे आहे. दुपारनंतर एखाद्या अनुकूल घटनेने उत्साह वाढेल.


सिंह : शुभ रंग : अबोली| अंक : २ मनाविरूध्द घटनांनी बेचैन व्हाल. आज कुणाकडे सल्ले मागत बसू नका. आज तुम्हाला एकांताची तसेच सत्संगाची गरज भासेल. उपासना मानसिक बळ देईल.


कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ९ उद्योगधंद्यातील महत्वपूर्ण करार मदार दुपारपूर्वीच उरकून घ्या. संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क रहा. वैवाहीक जिवनांत दुपारनंतर मौन सर्वार्थ साधनम.


तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६ आज कार्यक्षेत्रात काही पेचप्रसंगांना सामोरे जावे लागेल. क्वचित प्रसंगी अडला हरी….या म्हणीचा प्रत्यय येईल. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.


वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६ कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येईल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात आजचा संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.


धनू : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४ आज तुम्ही आपले आवडते छंद व व्यासंग जपण्यासाठी आवर्जुन वेळ कढाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीत जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. गृहाेद्योग तेजीत चालतील.


मकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : १ थोडयाफार काैटुंबिक कटकटींवर जोडीदाराच्या सहाय्याने मात कराल. बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा. खोट्या सह्या करणारे अडचणीत येतील.


कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : २ आज उंची राहणीमानाकडे कल राहील. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. खिशात पैसा खेळता असल्याने स्वत:चा मोठेपणा जपता येईल.


मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ६ आज हातचे सोडून मृगजळामागे धावायचा मोह होईल. काही चुकीचे सल्ले देणारी माणसे भेटतील. कोणतेही निर्णय जोडीदाराच्या सल्ल्यानेच घ्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा