राशिन येथे प्रमाणपत्र घेण्यासाठी परप्रांतियांची गर्दी

राशिन, दि. ६, मे २०२०: सध्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यात हातावर पोट भरणा-या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यात सरकारने परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. त्यामुळे राशिन आणि बारडगाव या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी परप्रांतियांनी हजारोंच्या संख्येने प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले की, कर्जत, राशिन, जगदंबा कारखाना, परिसरातील चार हजारांच्या आसपास परप्रांतीय नागरिकांनी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा