कर्जत २६ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सर्वच भागात ताळेबंदची परिस्थिती पाहण्यास मिळाला आहे. काही ठिकाणी ताळेबंदचे नियम हे कडक तर काही भागात सौम्य पाहण्यास मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचे अर्थ चलनाचे साधन म्हणजे आठवडे बाजार होय .हेच बंद असल्याने नागरिकांना आर्थिक संकट निर्माण होत आहे.
यामुळे राशिनच्या ग्रामस्थानी आठवडे बाजार सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडे मागणी केली आहे. राशीन ग्रामपंचायत उपसरपंच शंकर दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राशीन बाजार आठवडे चालू ठेवण्यासाठी व शेतकरी गोरगरीब जनतेच्या रोजीरोटीसाठी आठवडे बाजार चालू करण्यासाठी तहसीलदार नानासाहेब आगळे तसेच गट विकास अधिकारी अमोल जाधव यांना आठवडे बाजार चालू करण्यास परवानगी देण्यात यावी याबाबत निवेदन दिले यावेळी युवक नेते भीमराव साळवे, राशीन ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार सायकर, अतुल साळवे, दिपक थोरात, नाझीम भाई काझी, राजेंद्र सौताडे, अमोल जाधव, आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष