कर्नाटक, १४ फेब्रुवरी २०२१: ऑक्सफोर्ड स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी कर्नाटकच्या रश्मी सामंतची निवड झाली आहे. लंडनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे पद मिळविणारी रश्मी ही पहिली भारतीय महिला आहे. रश्मी मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची माजी विद्यार्थी आहे.
वास्तविक, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार रश्मी सामंत हिला या पदासाठी अन्य तीन स्पर्धकांच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त मतं मिळाली. युनियनच्या अध्यक्षपदासाठी देण्यात आलेल्या ३,७०८ मतांपैकी रश्मी ला १,९६६ मते मिळाली, जे इतर सर्व उमेदवारांपेक्षा जास्त आहेत.
रश्मी सामंत ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लिंकअर कॉलेजमध्ये एनर्जी सिस्टममध्ये एमएससीची विद्यार्थीनी आहे. तिने ऑक्सफोर्ड एसयूच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली, त्यामध्ये चार मुख्य प्राधान्यक्रम ठेवले, ज्यात तिला प्रचंड यश मिळाले.
आपल्या जाहीरनाम्यात रश्मी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परिषदांमध्ये साम्राज्यवादी प्रतिमा हटविण्याची आश्वासन करीत आहे. कोरोना महामारी संपेपर्यंत राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजा निःशुल्क करण्याची मागणी रश्मीने केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे