रश्मी ठाकरे यांना कोरोना ची लागण

मुंबई, २४ मार्च २०२१: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्या सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. रश्मी यांनी ११ मार्च रोजी कोरोना लसीचा डोस घेतला. यापूर्वी शनिवारी त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. त्यांनी ट्वीट केले होते आणि म्हटले होते की, “कोरोनाची सौम्य लक्षणे पाहिल्यानंतर मी माझी चाचणी केली ज्यानंतर माझी चाचणी सकारात्मक आढळली. मी माझ्या संपर्कातील लोकांना कोरोना तपासणी करून घेण्याची विनंती करतो तसेच सर्वांना जागरुक राहण्याची विनंती करतो. कोविड अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करा आणि सुरक्षित रहा.”

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर

महाराष्ट्र हे देशातील अशा राज्यांपैकी आहे जिथे कोरोनाची प्रकरणे सर्वात जास्त समोर येत आहेत. २३ मार्च रोजी महाराष्ट्रात २८,६९९ नवीन प्रकरणे नोंदली गेली. या व्यतिरिक्त १३,१६५ लोकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात रिकवरी दर ८८.७३ टक्के आहे. आतापर्यंत राज्यातील २२,४७,४९५ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. मंगळवारी कोरोना मुळे राज्यात १३२ लोकांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा