मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले.
परंतु अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.त्यामुळे अजितदादा यांचे बंड कायम असल्याची चर्चा सध्या आहे.
खासदार सुप्रिया सुळे, पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांना माघारी फिरण्याचं आवाहन केले आहे. त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही अजित पवारांची भेट घेऊन आले. तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. परंतु अजित पवार माघारी फिरण्याच्या मनस्थितीत नाहीत.
अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत.