राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सोशल डीस्टस्टिंग पाळून रक्तदान करा: अजित पवार

मुंबई, दि.५ जून २०२०: राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करु नका. त्या ऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचं राज्यभर आयोजन करण्यात यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादी पक्ष येत्या १०जून रोजी २१ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. कोरोना संकटामुळे हा वर्धापन दिन सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही. पण राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पुढे यावं, स्वत: रक्तदान करावं, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा