शेतकऱ्यांसाठी खरंच आहे का….राष्ट्रीय दिवस?
पुणे : भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा आज वाढदिवस. म्हणून आजचा दिवस आज (२३ डिसेंबर) ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरनसिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे.चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी नाबार्ड ची स्थापना केली. त्यामुळे वाजपेयी सरकारच्या काळात हा दिवस “राष्ट्रीय शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय वाजपेयी यांनी घेतला होता.
एकीकडे भारत २०२० मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. एकीकडे ‘राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो. मात्र त्याच देशात या शेतकऱ्याला कुठलीही सुविधा यांना मिळत नाही आणि दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत.
आज शेतकरी अत्यंत केविलवाणा झालेला आहे. शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात हा राजा अतिशय दिनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना ह्या आपत्तींचा बळी हा बळीराजा ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्याप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे उचित आणि अत्यावश्यक गरजेचे आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक विवंचनेतून हा शेतकरी जात आहे. कोणत्याही समस्येने जरा ही बळीराजांना-शेतकऱ्यांना कोणी ग्रासले असेल तर याला आपला मदतीचा हात नक्की मिळाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकांनी याबाबत आपला मदतीचा हात समोर केला पाहिजे हि सध्याची परिस्थिती झाली आहे. सगळ्यांनी अवती-भवती असणाऱ्या शेतकर्यांना त्यांचा स्वाभिमान जराही न दुखावता, हवी तेवढीच आणि तितकीच मदत अगदी स्वेच्छेने केली पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना; सोयी-सवलती निव्वळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचती पाहिजे. अनेक शेतकरी यांचे शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही किंवा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घायचा हे त्यांना माहिती होत नाही. समाजात कितीतरी शेतकरी डोळसपणे आधुनिक आणि पारंपारिक शेती यांचा योग्य तो समन्वय साधून आणि योग्य तो शेतीपूरक जोड-धंदा कसा करायचा याबाबत त्यांना माहिती आपण देऊ शकतो. यशस्वी शेतकरी म्हणून अत्यंत सुखी-समाधानी आणि तृप्त जीवन जगण्याचा धीर आपण त्यांब्ना देऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात आपल्याला या व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांना या विषयी माहिती देऊन शक्य तेवढी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे..
चला तर मग आज ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ निमित्य एक निर्धार करू आणि आज आपला शेतकरी ज्या परिस्थितीत जगतोय त्याला यातून आपल्या मदतीने बाहेर काढू आणि शक्य तेवढी मदत करू असा निर्धार आपण या निमित्त्याने करूया. “जय जवान-जय किसान”