राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन बैठक

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम २५ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे पूर्वनियोजनासंदर्भात उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी शनिवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत म्हणाल्या, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीचा जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवस हा पर्वती मतदारसंघात साजरा करण्यात येणार आहे. नागरीकामध्ये निवडणुक विषयक माहितीचा प्रसार होण्यासाठी तसेच जास्तीत जास्त भावी मतदार व नवमतदारांमध्ये मतदार नोंदणीसाठी जागृती करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम आगळा-वेगळा साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही सावंत यांनी संबंधितांना दिल्या. तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये रांगोळी, चित्रकला,निबंध यासह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तराबरोबरच तालुका, मतदान केंद्रस्तरावरदेखील असे कार्यक्रम होतील, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा