रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा: उदयनराजे भोसले

सातारा: भाजपचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्र घेत बांधकाम कंपनी आणि प्रााधिकरणला रस्ता दुरुस्तीबाबत इशारा दिला आहे. रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्रााधिकरणाने नोव्हेंबरअखेर रस्त्यांची आवश्यक ती सर्व डागडुजी करावी, असे उदयनराजे भोसले असा त्यांच्या शैलीत सुनावले आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्रााधिकरणाने नोव्हेंबरअखेर रस्त्यांची आवश्यक काम करावी, असे उदयनराजे यांनी सांगितले आहे.

१ डिसेंबरपासून सातारा-पुणे रस्त्यावरील दोन्ही टोल नाक्यांवरील टोल वसुली करू दिली जाणार असा इशारा उदयनराजे यांनी रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्रााधिकरणाला दिला. ‘महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी जनतेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे,’ यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची काम पूर्ण करावी असे उदयनराजे यांनी सांगितले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा